pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी मोफत पुर्व प्रशिक्षण

0 4 1 0 5 2
[sp_wpcarousel id="1375"]
  • जालना/प्रतिनिधी,दि. 26
  • संघ लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांच्यामार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारासाठी दि.3 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणाऱ्या कंम्बांईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परिक्षेकरीता दि. 19 मे रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्युज (रोजगार समाचार) मध्ये जाहिरात प्रसिध्द झाली होती. तरी जालना जिल्हयातील इच्छुक उमेदवारानी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जालना येथे दि. 12 जून 2023 रोजी दुपारी 3 वाजता मुलाखतीस हजर रहावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
    संघ लोकसेवा आयोगाकडे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 6 जुन 2023 अशी आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.upsconline.nic.in या संकेतस्थळाचा वापर करावा. कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस या परिक्षेव्दारा कायमस्वरुपी व अल्पमुदतीचे कमिशन साठी निवड करण्यात येते. कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेची पुर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक-युवतीसाठी दि.19 जुन 2023 ते दिनांक 01 सप्टेंबर 2023 या कालावधीत सीडीएस कोर्स क्रं. 61 चे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भेाजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आलेली आहे.
    मुलाखतीस येतेवेळी त्यांनी पुणे सैनिक कल्याण विभागाच्या पीसीटीसी ट्रेनिंग च्या गुगल प्लस पेजवर किंवा सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून नाशिक सीडीएस क्र.61 कोर्ससाठी संबंधीत या परिशिष्टांची प्रत डाऊनलोड करुन दोन प्रतीत पुर्ण भरुन सोबत घेवुन यावी. अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक यांचा दुरध्वनी क्र. 0253-245032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दुरध्वनीवर संपर्क करावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 5 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे