शातोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी विकास भोईर यांची निवड

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3
कराटे क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उरण तालुक्यातील नवघर गावचे सुपुत्र तथा विजय विकास सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष विकास भोईर यांची शातोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया च्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तसे नियुक्ती पत्र संघटनेचे जनरल सेक्रेटरी बिष्णूप्रसाद शर्मा यांनी विकास भोईर यांना दिले आहे. विजय विकास सामाजिक संस्था सेल्फ डिफेन्स कराटे ऑल स्टाईल कराटे कन्सस्ट्रॅक्टर असोसिएशन या अकॅडेमीच्या माध्यमातून विकास भोईर यांनी आजपर्यंत अनेक कराटे स्पर्धा भरविल्या आहेत. अकॅडेमीच्या माध्यमातून अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडू, कराटे पटू तयार झाले आहेत.गुणिजन, उत्तम कराटे पटू घडविण्यात या अकॅडमीचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे विकास भोईर यांच्या कार्याची दखल घेत त्यांची शातोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया च्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विकास भोईर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.