मनोज पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.10
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती,
इतर मागासवर्गीय जाती कल्याण, शारीरीक व मानसिकदृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी आदींसाठी तसेच
समाजकल्याण क्षेत्रात मौलीक कार्य करणाऱ्या राज्यातील गुणवंत व्यक्तींचा दरवर्षी शासनाच्या वतीने राज्यस्तरीय “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार” देवून शासकीय कार्यक्रमात गौरविण्यात येतो .सदर पुरस्कार हा उरण तालुक्यातील पाणदिवे गावचे सुपुत्र मनोज पाटील यांना जाहिर झाला आहे. १५ हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स जमशेदजा भाभा नाट्यगृह, नरिमन पॉईंट,मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
मनोज पाटील यांनी आपल्या महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेली २५ वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.पुनाडे आदिवासी वाडीतील विद्यार्थ्यांना दत्तक घेवून गेली १५ वर्षे त्यांचा शैक्षणिक खर्च करत आहेत. नेत्र तपासणी शिबीरातून शेकडो नेत्र रूग्णावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत.रक्तदान शिबीरे,आरोग्य तपासणी शिबीरे ,महिला व बालविकास कल्याण या शासकीय योजनेतून पालक नसलेल्या विद्यार्थीना शैक्षणिक खर्च मिळवून दिला आहे.कोव्हीडच्या काळात आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंच वाटप केले आहे .एड्स या रोगाबाबत गेली २५ वर्षे जनजागृत करण्यात येत आहे.कर्मयोगी बाबा आमटे यांच्या आनंदवन व सोमनाथ प्रकल्पात जावून तेथे राष्ट्रीय एकता शिबीरात रायगड च प्रतिनिधीत्व करून सामाजिक हित साधण्याचा त्यांनी प्रयन्न केला आहे.
सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली च्या सुरवातीला रावे व आत्ता कळंबोली शाखेत शैक्षणिक अध्यापनाच एकूण २८ वर्ष कार्य करत आहेत.गेल्याच वर्षी त्यांना शैक्षणिक कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा “क्रांतीज्योती सावित्रीमाई राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांने” गौरविण्यात आले होते.
मनोज पाटील यांना जाहीर झालेल्या राज्यस्तरीय” डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार “बद्दल त्यांचे रायगड जिल्यातून अभिनंदन होत आहे.