pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

लासुर स्टेशन येथे गुरुवारी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी गीताबन कला महोत्सवाचे आयोजन

आमदार प्रशांत बंब यांच्या वाढदिवसानिमित्त गीत गायन नृत्य स्पर्धा

0 4 1 0 1 9
[sp_wpcarousel id="1375"]

छ. संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.16

आमदार प्रशांत यांच्या वाढदिवसानिमित्त लासुर स्टेशन येथे गंगापूर खुलताबाद तालुक्यातील प्राथमिक ते माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी गीत गायन स्पर्धा व नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून गुरुवारी दि. 18 व 19 जानेवारी रोजी गीताबन कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
गंगापूर खुलताबाद तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच विद्यालय स्तरावरील ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना आपल्या अंगी असलेली कला सादर करता यावी यासाठी गीताबन कला महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत इयत्ता ५वी ते ७वी, इयत्ता ८वी ते १२वी मध्ये शिकणाऱ्या गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळेतील विध्यार्थ्यांसाठी समूह गीत गायन, समूह नृत्य, वैयक्तिक नृय, वैयक्तिक गीत गायन अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना रोख अनुक्रमे पाच हजार 355, तीन हजार 330, दोन हजार 223 तसेच उत्तेजनार्थ एक हजार 53 रुपयांची अशी 40 पारितोषिके, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
दि. १८ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती लासुर स्टेशन समोरील गीताबन येथे सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होऊन कार्यक्रमास सुरवात होईल.
दोन्ही तालुक्यातील सहभागी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास व सादरीकणास वेळेवर हजर राहावे असे आवाहन आयोजक तथा सरपंच मीनाताई संजय पांडव यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 1 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे