जालना शहरासाठी नाट्य व संगीत चळवळीचे प्रेरणास्थान व वैभव असलेल्या मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहाची आज रोजी दयनीय अवस्था झाली आहे. या नाट्यगृह दुरूस्ती व नूतनीकरणाचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशना दरम्यान नागपूर येथे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे भाजपाच्या पदाधिकारी शुभांगी देशपांडे यांनी सादर केला. 14 डिसेंबर रोजी मुनगुंटीवार यांची भेट घेऊन यावर चर्चा करण्यात आल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
हा प्रस्ताव सुमारे आठ कोटींचा आहे.
सादर केलेला प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठवून त्यावर निर्णयाची अंमबजावणी करू असे मुनगुंटीवार यांनी आश्वासन दिले आहे. हा प्रस्ताव तयार करण्यासाठी जालना महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी संतोष खांडेकर, अभियंता सय्यद सऊद, अनंत लोखंडे, कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर यांनी मोलाची मदत केली. त्याच बरोबर सिध्दीविनायक मुळे, नगरसेवक अशोक पांगारकर यांनी हा प्रस्ताव करताना सहकार्य आणि मार्गदर्शन केले. शासन दरबारी याचा विचार व्हावा यासाठी माझ्या परीने प्रयत्न केले असल्याचे शुभांगी देशपांडे यांनी सांगितले.