भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी अंतिम संधी

जालना/प्रतिनिधी,दि.4
सन 2021-22 ते 2023-24 या कालावधीतील कोणत्याही विद्यार्थ्याना त्रुटी पुर्ततेची संधी दिली जाणार नाही. नाही तसेच कोणताही विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही, तरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी अंतिम संधी दि .14 फेब्रुवारी 2025 पर्यंत देण्यात येत आहे, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासन निर्णय दिनांक 13 जुन 2018 अन्वये शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याना शासन निर्णयानुसार देय असलेली रक्कम विद्यार्थ्याच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
योजनेसाठी संबधित लाभार्थ्याना त्रुटी पुर्ततेचे पत्र संबधीत लाभार्थ्यांच्या मुळ पत्त्यावर पाठविण्यात आलेले आहे. तसेच दि. 24 ऑक्टोबर पर्यत व दुसऱ्यांदा दि. 31 डिसेंबर 2024 पर्यंत त्रुटीपूर्तता करण्याबाबत कळवुन देखील अद्यापपर्यत बऱ्याच विद्यार्थ्याचे अर्ज त्रुटीमुळे प्रलबित आहेत. त्यामुळे सदरील लाभार्थ्याना स्वाधार योजनेचा लाभ देता आला नाही. त्याअनुषगांने सन 2021-22, सन 2022-23 व सन 2023-24 या वर्षामध्ये अर्ज सादर केलेल्या (नवीन व नुतनीकरण) ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यत त्रुटीची पुर्तता केलेली नाही अशा सर्व विद्यार्थ्यानी समाज कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहुन आपल्या अर्जातील त्रुटीची खात्री करुन सदरील त्रुटया दिनांक 14 फेब्रुवारी 2025 पर्यत प्रत्यक्ष कार्यालयात दाखल कराव्यात. वरील आर्थिक वर्षातील विद्यार्थ्यानी विहित मुदतीत त्रुटी पुर्तता सादर न केल्यास सदरील अर्ज नस्तीबध्द करण्यात येतील. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.