pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि आणि महिला मंडळ यांच्या वतीने उलवे मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

0 4 1 0 1 3
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20

आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि आणि महिला मंडळ यांच्या वतीने श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सेक्टर १७ उलवे नोड येथे मोठया जल्लोष मध्ये साजरी करण्यात आली.शिवजयंतीचे यंदाचे हे ८ वे वर्ष आहे.आम्ही उलवे कर मित्र मंडळचे संस्थापक सचिन राजे येरुणकर हे नेहमीच सामाजिक आणि संस्कृतीक उपक्रमामध्ये पुढाकार घेऊन विविध उपक्रम, कार्यक्रम साजरे करत असतात आणि उलवे मध्ये त्यांच्या मंडळाच्या वतीने श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.यामध्ये जेष्ठ नागरिक यांचा सत्कार, लहान मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा, वेषभूषा, मर्दाणी खेळ आणि आम्ही उलवेकर मित्र मंडळच्या भव्य दिव्य अशा रॅलीचे आयोजन असे विविध उपक्रम कार्यक्रम राबविण्यात आले.या उत्तम कार्यक्रमांची चर्चा संपूर्ण उलवे मध्ये झाली. उत्तम आयोजन व नियोजन असल्यामुळे नागरिकांनी, शिवप्रेमीनी विविध उपक्रमांचे कौतुक करत या शिवजयंतीच्या कार्यक्रमात मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला.यावेळी विनोद थोरात, नारायण मुरकर, रमेश खंडू, रोहन खंडू, साई पैकडे, संदीप नलावडे, प्रदीप नलावडे, सुरेश फटाक, संदीप पाटील, तनय मुरकर, संदीप साखरकर, कीर्ती फाटक, रचना येरुणकर,राणी सिंग,नम्रता मुरकर, सविता दवे, अनुश्री घारे, अपर्णा सुर्वे, सोनाली ठाकूर, सरिता साळवे, प्रिया साळवे, श्रमिका दळवी, उषा डे, कु. सिद्धी पैकडे, शीतल माने, पूर्णिमा जोशी आणि समस्त उलवेनोड रहिवाशी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 1 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे