हर घर तिरंगा भारताच्या एकजुटीचे प्रतीक – वाघमारे.सी.जी.
हर घर तिरंगा अभियान सप्ताह निमित्त शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन हवेत फुगे सोडुन प्रकट केली देशभक्तीची हर घर तिरंगा
जालना/प्रतिनिधी, दि.14
जालना तालुक्याती राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना या शाळेत हर घर तिरंगा अभियान निमित्त शाळेचे मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व यावेळी आजचे विद्यार्थी हे उद्याच्या बलशाली भारताचे आधारस्तंभ आहेत.भारत देशाला अधिक प्रगशील व शक्तीशाली बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन विविध क्षेञे पदक्रांती करावीत.अनेक ज्ञात.अज्ञात वीरांच्या बलिदानुतून आपला भारत देश स्वतंञ झाला आहे.स्वातंञ्याची फळे केवळ त्यांच्यात बलिदानातून चाखत आहोत स्वातंञ्यासाठी सर्वस्व अपर्ण केलेल्याचे स्मरण करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य असून दि.१३ते१५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येकांने अभिमानाने आपल्या घरावर तिरंगा तिरंगा फडकवून देशभक्तीचा संदेश सर्वदूर पोहोचवावा.असा सूर राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना या शाळेतील आज कार्यक्रमात निघाला.भारतीय स्वातंञ्याचा अमृत महोत्सवानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे प्रमुख उपस्थिती होती.ते बोलताना म्हणाले की, मुलांमध्ये नैतिक मुल्यांचे संस्कार रूजविणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे शाळा होय.उद्याच्या भारताचे आधारस्तंभ शाळेत घडवले जातात.शिक्षणाच्या जोरावर आपल्याला हवे ते यश आपण संपादन करू शकतो.त्यामुळे भारत देशाला अधिक सशक्त व बलवान बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या पध्दतीने शिक्षण घेण्याचे आवाहन केले व कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचे कौतुकही केले.
*हवेत फूगे सोडुन प्रकट केली देशभक्ती भावना*
भारतीय हर घर तिरंगा महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा अभियानअंतर्गत राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना.येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थीं व विद्यार्थींनीनी हर घर तिरंगा सामूहिकरीत्या राष्ट्रगीत गाऊन देशभक्तीचा संदेश दिला मान्यवराच्या हस्ते तिरंगी फुग्यांचा गुच्छ आकाशात सोडण्यात आला.विद्यार्थां व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर चिमुकल्यांसह बहारदारअशी नुत्ये,लेझिम व्दारे विविध प्रतिकृती सादर केल्या हर घर तिरंगा महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात संपुर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते या वातावरणात संपुर्ण वातावरण विद्यार्था व विद्यार्थींनी केलेल्या प्रतिकृती ,गीत ,समुह नुत्य,मॅरोथाॅन, शपथ घेण्यात आली प्रत्येक विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते श्रीमती.एस.आर.कुलकर्णी.,वाय.बी.मदन.,डी.एन सोनकांबळे.,पी.पी.नागरे.,श्रीमती.ए.बी.देशपांडे.,एल.बी.जाधव.,आर.एस.ठाकरे.,एस.बी.राऊत.,श्रीमती.एम.ए.खरात.आदिनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचलन व आभार शाळेचे सांस्कृतीक विभाग प्रमुख श्री.नागरे.पी.पी.केली..!



