बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन
ट्रस्ट, बदनापूर व प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मार्च रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनाने इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, बदनापुर येथे जनऔषधी दिवसानिमित्त
भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र आर. पी. रोड,जालनाच्या संचालिका राखी सर्वेश झंवर, नोडल ऑफिसर जन औषधी परियोजना शिवम
पाटील, तसेच जालना येथील सहाय्यक आयुक्त जाधव यांची उपस्थिती लाभली.यावेळी निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट च्या वतीने इन्स्टिटयूट ऑफ
फार्मसी, बदनापुरचे प्राचार्य डॉ. सुनील जायभाये यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी फार्मसी महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांना सर्व मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगीराज मुळे यांनी केले. प्रा. संदीप फोके यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कल्याण देवकत्ते
तसेच सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.