आढावे बंधू यांना सलग १४ वेळी एम.डी.आर. टी.सन्मान
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.23
डावरगाव देवी येथील जिवन विमा सल्लागार गॅलेक्सी क्लब मेंबर संतोष आढावे व श्री अंकुश आढावे बंधू यांना भारतीय जिवन बीमा निगम ने MDRT या सर्वोच्च पुरस्काराने शनिवारी तारीख २२ तब्बल १४ व्यांदा सन्मानित केले. सलग चौदाव्यांदा हा पुरस्कार जालना शाखेचे चिफ मॅनेजर श्री. टी. रामचंद्र सर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी शाखेचे उपशाखाधिकारी वाघ साहेब, शाखाधिकारी नाझरकर साहेब, प्रशासकिय अधिकारी यादव साहेब, चिंतल साहेब, तोतला मॅडम, लोंढेमॅडम यांची उपस्थिती होती. भारतीय जीवन विमा निगमच्या जालना शाखेतून सलग १४ वेळा एम. डी. आर.टी. सन्मान प्राप्त करणारे आढावे बंधू हे एकमेव आहेत. डावरगाव देवी सारख्या ग्रामीण भागातून येऊन जिल्हास्तरावर अशा पद्धतीचा सन्मान प्राप्त करणारे आढावे बंधू यांचा जाफराबाद तालुक्यातील विविध संघटना, संस्था, व्यापारी, पत्रकार, डॉक्टर आणि मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.



