pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सांस्कृतिक कार्यक्रमास आपणासह सर्व जालनेकर निमंत्रीत!

फेस्टिवलचे उद्या संजय आवटे यांच्या हस्ते उद्घाटन-राजेंंद्र गोरे

0 3 2 1 8 0
जालना/प्रतिनिधी, दि.6
जालना : वर्षभराच्या खंडानंतर यावर्षी जालना शहरात गणेश फेस्टीव्हल 2024 मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार आहे. त्याच अनुषंगाने स्व. कल्याणराव घोगरे स्टेडीयममध्ये येत्या आठ सप्टेंबर रोजी
जालना गणेश फेस्टिवल सुरुवात प्रख्यात व्याख्ताते संजय आवटे यांच्या उद्घाटनानंतर होणार आहे, अशी माहिती जालना गणेश फेस्टीवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी दिली असून फेस्टीवलमध्ये होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमास आपणासह सर्व जालनेकर निमंत्रित आहेत, असेही श्री. गोरे यांनी यावेळी सांगितले.
फेस्टीवलमध्ये होणार्‍या कार्यक्रमाची रुपरेषा सांगण्यासाठी श्री. राजेंद्र गोरे, संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी फेस्टीवलच्या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी माहिती देतांना श्री. गोरे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दिनेश फलके, राजेंद्र राख, अशोकराव आगलावे, किरण गरड, चंद्रशेखर वाळींबे, अशोक उबाळे, सुभाष कोळकर, सतीष देशमुख, अजिक्य घोगरे यांची आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्री.  गोरे म्हणाले की, उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार असून अब्दुल सत्तार, खा. डॉ. कल्याण काळे, आ. कैलास गोरंट्याल, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे,  खा. संदीपान भुमरे, आ. राजेश टोपे, आ. बबनराव लोणीकर,  आ. नारायण कुचे,  आ. राजेश राठोड, आ. संतोष पा. दानवे, आ. विक्रम काळे, आ.सतीष चव्हाण, आ. विक्रम काळे, उद्योजक घनशाम गोयल, माजी आमदार सर्वश्री अरविंदराव चव्हाण, शिवाजीराव चोथे, संतोष सांबरे, सुरेशकुमार जेथलिया तसेच माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, माजी जि. प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, लक्ष्मण वडले, हरीश बैजल, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ,  जिल्हा पोलीस अधिक्षक अजय बन्सल, मनपा आयुक्त संतोष खांडेकर, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा मिना, उद्योजक कैलास लोया, तसेच राजाभाऊ देशमुख, बद्रीनाथ पठाडे, ए. जे. बोराडे, निसार अहेमद देशमुख, सतीश टोपे, भाऊसाहेब घुगे, अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, शेख महेमूद, डेव्हीड घुमारे, नंदु जांगडे, भास्करराव दानवे, बाला परदेशी, अशोक पांगारकर, विनीत साहनी आदींची उपस्थिती राहणार आहे, असे सांगून श्री.गोरे म्हणाले की,  9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा. ह.भ.प. पुरुषोत्तम पाटील यांचे हरि हरि किर्तन होणार असून दि. 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा. कलारंजन मुंबई निर्मित रंग तरंंग हा ऑकेट्रा होईल तर 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा. ड्रीम गर्ल प्रिया पाटील व धिंगाणा क्वीन स्वाती मुंबईकर यांचा बहारदार लावण्यांचा कार्यक्रम होणार असून दि. 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा. जिव माझा गुंतला फेम योगिता चव्हाण नाईट ्रे्रआणि दि. 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा. भरत जाधव एण्टरटेनमेंट निर्मित केदार शिंदे लिखीत दिग्दर्शीत तू तू मी- मी सिनेमॅटीक नाटक विविध भूमिकेत भरत जाधव, दि. 14 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीचा आणि लोककलेचा पारंपारीक नृत्याविष्कार श्लोक निर्मीत अशी आमची माय मराठी हा मनोज माझीरे निर्मित आणि याचे सुत्रधार आहेत स्वप्नील कांडेकर, दि. 15सप्टेंबर रोजी आंतर राष्ट्रीय दर्जाचे बॉलीवुड स्टार अभिजीत घोषाल नाईट आणि दि. 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने समारोप होईल, असेही श्री. गोरे यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. लाखे पाटील यांनीही पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.
यावेळी  कार्याध्यक्ष विजय चौधरी, विष्णू पाचफुले, गोपाल गोयल, राजेश सोनी, बाला परदेशी, हरिहर शिंदे, सुरेश मुळे,अवनिष गरड, बबनराव गाडेकर, सतिष देशमुख, राजेंद्र भोसले, संदीप गायकवाड व संयोजन समितीतील पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे