pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मौजपुरी येथील अजिंक्य ढोकळे 14 वर्ष वयोगटात कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम; तालुका स्तरावरही आला होता प्रथम; कुस्तीने वेधले सर्वांचे लक्ष

0 4 1 0 1 5
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी, दि 15

जालना तालुक्यातील मौजपुरी येथील अजिंक्य सत्यनारायण ढोकळे या विद्यार्थ्याने तालुका स्तरावर 41 वजन गटात 14 वर्षा खालील कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर आज शुक्रवार दि. 13 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हा स्तरिय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याची आता पुढील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धा सुरु आहेत. दरम्यान आज 14 वर्षाखालील 41 वजन गटातील कुस्ती स्पर्धेत या स्पर्धेत मौजपुरी येथील अजिंक्य सत्यनारायण ढोकळे या विद्यार्थ्याने रंगतदार कुस्ती करीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी कुस्तीचा डाव खेळत अजिंक्य ढोकळे याने प्रतिस्पर्धकाला चितपट करीत कुस्ती जिंकली.जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत अजिंक्य ढोकळे याने प्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान मिळविला आहे. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सरपंच बद्रीणारायण भसांडे, सत्यनारायण ढोकळे, बालाजी बळप, अंकुश काळे, अच्युत मोरे, कृष्णा हिवाळे यांच्या सह गावकर्यांनी अभिनंनद केलंय.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 1 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे