ब्रेकिंग
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025 मोटारगाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास निर्बंध

0
4
1
0
1
8
जालना/प्रतिनिधी,दि.23
राज्य निवडणूक आयोगाने दि.15 डिसेंबर 2025 ते दि.16 जानेवारी 2026 या मतमोजणीच्या दिवसापर्यंत महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025-26 साठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन जालना महानगरपालिका निवडणूक प्रचारफेरी/ मिरवणुकामध्ये जास्तीत जास्त 10 वाहने वापरता येतील. त्यापेक्षा जास्त वाहने वापरण्यास महानगरपालिका क्षेत्रामध्ये निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तिल यांनी जारी केले आहेत.
0
4
1
0
1
8



