संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून उरण मध्ये राबविण्यात आले समुद्र किनारी स्वच्छता अभियान

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24
सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपीता रमीत जी यांच्या मार्गदर्शनानुसार संत निरंकारी मिशन च्या माध्यमातून उरण सिटी ब्रांच मधे प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल – स्वच्छ मन हे उपक्रम दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रविवार पिरवाडी बीच , नागाव , उरण या ठिकाणी संपन्न झाले.या ठिकाणी उरण सिटी ब्रांच चे १३५ पेक्षा अधिक सेवादल आणि संत महात्मा उपस्तीत होते आणि त्यांनी समुद्र किनारा व आजूबाजूच्या परिसराची सफाई केली.सुमारे सकाळी ७ वाजता ,सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या चरणी सर्व उपस्थित संत महात्मा यांनी प्रार्थना करुन प्रोजेक्ट अमृत, स्वच्छ जल – स्वच्छ मन या कार्यक्रमाची सुरवात केली.
निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य शिकवणूकीमुळे निरंकारी भक्तगणांमध्ये मानव सेवेची भावना दृढमूल झालेली असून ते इतर अनेक सामाजिक सेवांमध्ये निरंतर आपले योगदान देत आहेत.उरण सिटी ब्रांचचे मुखी समीर पाटील यांनी युगदृष्टा बाबा हरदेव सिंह जी महाराज यांचा उल्लेख करत त्यांनी दिलेल्या शिकवणींचे स्मरण केले.तसेच आंतरीक मानाच्या स्वत्छतेचे महत्त्व केवळ ब्रह्मज्ञान घेवूनच प्राप्त करता येईल असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी नागाव ग्रामपंचायत उप सरपंच भूपेंद्र घरत उपस्थित होते. व ग्रामपंचायत समितीच्या सदस्या दीपिका पाटील हे सुद्धा उपस्थित होते.तसेच सारडे विकास मंचाचे अध्यक्ष नरेंद्र म्हात्रे व गणेश घरत (जेएनपीटी अंतर्गत युनियन अध्यक्ष) उपस्थित होते.संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेवादल युनिट व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांनी या प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल – स्वच्छ मन या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. तसेच स्थानिकांनी या स्वच्छता अभियानाचे भरपूर कौतुक केले.