pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बजाज नगर येथे शाडू मातीपासून श्री गणेश मूर्ती बनवणे उपक्रम संपन्न

0 4 1 0 1 5
[sp_wpcarousel id="1375"]

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.29

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे पिठाधीश आदरणीय परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व बालसंस्कार विभाग प्रमुख गुरुपुत्र आदरणीय श्री नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाने बजाजनगर सेवा केंद्र येथे पर्यावरण पूरक शाडूमाती पासून श्री गणेशमूर्ती बनविणे उपक्रम राबविण्यात आले.
भविष्याचा विचार करता आजच्या काळात पर्यावरणाचे संवर्धन करणे अती आवश्यक बाब असून त्याच माध्यमातून परिसंस्था,वनस्पती आणि प्राणी यांचे रक्षण करणे हे उद्दिष्ट होय. पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने “पर्यावरण पूरक शाडूमाती पासून गणपती बनवणे ” हा उपक्रम राबवत एकूण 213 विद्याथ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेच्या जोरावर कलेचा सुंदर अविष्कार करत बाप्पाच्या अतिसुंदर आणि वेगवेगळ्या आसनातील मूर्ती बनविल्या.या उपक्रमातून लहान बालकांना आपली संस्कृती आणि तिचे विविध पैलू समजण्याचे निमित्त प्राप्त झाले.पर्यावरणपूरक गणपतीमुळे भाविकांची श्रद्धा अबाधित राहते आणि निसर्गाचाही सन्मान होतो.पुढील पिढीसाठी स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण राखण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने हा सण साजरा करावा ही काळाची गरज आहे,हाच संदेश व आदर्श यावेळी विद्यार्थ्यांनी समाजाला दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 1 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे