शक्ती फाउंडेशन च्या बक्षीस वितरण सोहळ्यास उत्स्फुर्त प्रतिसाद
अर्चनाताई सोनार चे केले कौतुक

पुणे/आत्माराम ढेकळे,दि.17
पुणे: येथील स्त्री शक्ती फाउंडेशन च्या वतीने पिंपरी चिंचवड येथे आयोजित केलेल्या ‘राज्यस्तरीय बक्षीस वितरण ‘ सोहळ्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असुन या सोहळ्यात आयोजिका सौ.अर्चना सोनार यांच्या कार्याचा गौरव करण्यात येऊन मान्यवरांनी त्यांचे आपल्या मनोगता मधुन कौतुक केले.
स्त्री शक्ती फाउंडेशन ,पुणे संचलित अध्यात्मिक बाल संस्कार केंद्र,फ्रेंडस् योगा ग्रुप,ज्ञानाई महिला भजनी मंडळ ,आई विंध्यावासिनी महिला भजनी मंडळ , कार्यकारी महिला समितीच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते.त्यामध्ये प्रामुख्याने विनामुल्य योगशिक्षण,महिला आरोग्य शिबीर,सांस्कृतिक शिबीर,अध्यात्मिक शिबीर,योगशिबीर,लहान मुले व महिलांसाठी उन्हाळी शिबीर आदी कार्यक्रमाचे आयोजन होत असते.तसेच संपुर्ण महाराष्ट्रात विविध विषयानुसार आॕनलाइन राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.व त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो.याशिवाय विविध चर्चासत्र,परिसंवाद ,मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.अशाप्रकारे संस्थेच्या कार्याचा आढावा संस्थापक अध्यक्षा सौ.अर्चना ईश्वर सोनार यांनी या सोहळ्यात प्रास्ताविक माहिती मधुन व्यक्त केला.
या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा,रामरक्षा स्तोत्र स्पर्धा,ग्रुप गरबा ,दांडिया स्पर्धा ,छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा व भारुड स्पर्धा ,संगीत गायन स्पर्धा आदी स्पर्धांचे राज्यस्तरीय आयोजन करण्यात आले होते.यामध्ये अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिकांची निवड करण्यात आली.व त्यानुसार मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.महिला सशक्तिकरण आणि त्यांच्या अमुल्य योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने … स्त्री शक्ती फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या पर्वकाळात “राज्यस्तरीय स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा”कम्युनिटी हाॕल ,शिवाजी पार्क,पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्यास विधान परिषदेच्या आमदार सौ.उमाताई गिरीष खापरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.तर मुख्य अतिथी म्हणुन रुग्वेद सुवर्णवार्ता,नागपुर चे मुख्य संपादक दिनेश येवले व पुणेचे मुक्त पत्रकार आत्माराम ढेकळे हे उपस्थित होते.सन्माननीय मान्यवरात प्रमुख पाहुणे म्हणुन माजी नगरसेविका सौ.योगिताताई नागरगोजे ,सामाजिक कार्यकर्ते गौरव सोनार हे देखील उपस्थित होते. प्रारंभी श्री संत गजानन महाराज व संतशिरोमनी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांनी करुन दीप प्रज्वलन केले.या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना गौरव चिन्ह देऊन बक्षीस वितरण करण्यात आले.या सोहळ्यात आमदार उमाताई खापरे यांनी आपल्या भाषणात महिला सशक्तिकरणाची आवश्यकता असे सांगुन अर्चनाताई स्त्री शक्तीचे मोठे कार्य करीत असल्याचे नमुद करुन त्यांच्या कार्याचा गौरव करुन कौतुक केले.यानंतर दिनेश येवले व आत्माराम ढेकळे यांनीही मनोगत व्यक्त केले.या सोहळ्यात जागतिक महिला दिना निमित्त महिलांचे शृगांर ( मेकअप व हेअर स्टाईल)बद्दल प्रात्यक्षिकासह सौ.सारिका सोमवंशी यांनी माहिती दिली.या कार्यक्रमात सोनेरी ग्रुप प्रकाशित ‘ दिनदर्शिका चे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तर रुग्वेद सुवर्णवार्ता च्या वृत्तसंपादिका या पदावर अर्चनाताई सोनार यांची नियुक्ती करण्यात आली. या सोहळ्याचे उत्कृष्ट सुत्रसंचलन सौ.नीता बागडे यांनी केले.सोहळ्याच्या आयोजनात सोनेरी ग्रुपचे उपाध्यक्ष आशिष बागुल यांनी मोलाचा सहभाग घेऊन मेळावा यशस्वितेसाठी प्रयत्न केले.तसेच संपुर्ण कार्यक्रमात सौ.भारती भोळे,सौ.राणी मगदुम ,सौ.साधना आरुडे,सौ.ममता सोनार ,सौ.शितल मंदानेकर,सौ.सुप्रिया देसाई,सौ.फलफले,सौ.शारदा रत्नपारखी,सौ.ज्योती जोशी,सौ.छंदिता मंडल,सौ.दिपाली देसाई,सौ.सुवर्णा कुंभार,सौ.सीमा सांगळे,सौ.करुणा मिस्त्री,सौ.श्रध्दा बागुल,सौ.कल्पना नटुरे,सौ.मीना दळवी,सौ.मनीषा मोटे,सौ.वंदना मोटे,सौ.शुभांगी विभांडीक,सौ.छाया भोरे,सौ.संगीता काळोखे,अशा अनेक महिलांनी मोलाची मदत केली.शेवटी अर्चनाताई सोनार यांनी सर्वांचे आभार मानले.