
हदगाव/प्रभाकर डुरके,दि.8
बरडशेवाळा ता.7 बातमीदार ग्रामीण भागातील महिला अधिकारी कर्मचारीवर्ग वगळता सरासरी चुल आणि मुल यामध्ये ओळखल्या जात असत . परंतु महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागासह शहरी भागातील महिलांना सक्षम बनविण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेले उमेद अभियानातुन महिलांनी छोटे मोठे उद्योग उभारल्याने उद्योगातुन महिला सक्षम होत आहेत.
पळसा ता.हदगांव येथील घरकाम करणा-या महिला सविता विनोद निमडगे यांनी दहा महिला एकत्र करुन रेणुका महिला बचत गट स्थापन केला.गटाचे अध्यक्ष म्हणून काम करत स्टेट बैंक ऑफ इंडिया हदगांव शाखेत व्यवहार करीत पंचायत समिती कार्यालयाच्या उमेद अभियानाच्या माध्यमातून कर्ज घेत रेणुका महिला बचत गटाची पत निर्माण केली. उमेद अभियानात समुह साधन व्यक्ती म्हणून काम करत त्यांनी गावातील जवळपास तिस महिला बचत गटाचे काम करतात. त्यांनी हर घर तिरंगा राष्ट्रीय उपक्रमात सहभाग घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांकासह विविध सामाजिक नाविण्यपुर्ण कामाची दखल घेत त्यांना तालुका जिल्हा प्रशासनाकडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
सविता निमडगे यांनी शिलाई मशीन च्या काम करत रेणुका महिला बचत गटांकडुन घेतलेल्या कर्जातुन कापड उद्योग सुरुवात केली. त्याला सोबती पापड गिरणी घेतली. तर यावरच न थांबता पापड उद्योग सुरु करत चांगली कमाई केली असून या लघु उद्योगातुन त्यांनी भरारी घेतली आहे.
मी सर्व सामान्य घरकाम करणारी महिला आहे. चुल आणि मुल यामध्येच न राहता हलाकीच्या परिस्थितीवर मात करीत उमेद अभियानातुन सक्षम बनावे यासाठी प्रयत्न केला. उभारलेल्या लघु उद्योगासह केलेल्या कामाला अधिकारी कर्मचारीवर्गाच्या मिळालेल्या सहकार्याला वृतपत्र मिडीयाची प्रसिद्धीने लघु उद्योगासह प्रत्येक कामास यश मिळाले.
सविता निमडगे रेणुका पापड उद्योग संचालक
हदगांव तालुक्यात जवळपास दोन हजारांहून अधिक महिला बचत गट सुरु आहेत.त्यामध्ये जवळपास आठशे गटाला उमेद अभियानातुन लघु उद्योगाला कर्ज वाटप केले असून प्रत्येक गावात उमेद अभियान पोहचले आहे.महिलांनी सक्षम व्हावे हा उमेद अभियानाचा हेतु जवळपास यशस्वी होत आहे.
गंगाधर राऊत उमेद तालुका व्यवस्थापक