pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अप्पर वर्धा धरणात पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

0 4 0 9 2 8
[sp_wpcarousel id="1375"]

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.9

मोर्शी : मोर्शी तालुक्यात येणाऱ्या अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या सोळा वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. अल्फेज काजी असं मृत युवकाचं नाव असून तो वरूड तालुक्यातील शहापूर या गावातील रहिवासी होता.मित्रांसोबत आला होता पोहायला वरूड तालुक्यातील शहापूरचा मूळ रहिवासी असणारा अल्फेज काजी हा मोर्शी येथील नूर कॉलनीत राहणारे रिजवान खान यांच्याकडं मिस्त्री काम शिकण्यासाठी आला होता. रविवारी दुपारी अल्फेज हा नूर कॉलनी येथील आठ ते नऊ युवकांसोबत अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी गेला. अल्फेज हा समोर जाऊन पाण्यात पोहण्यासाठी गेला असता तो पाण्यात बुडत असल्याचं पाहून मुलांनी आरडाओरड केली.पोलीस पोहचले घटनास्थळी दरम्यान या घटनेची माहिती त्वरित मोर्शी पोलिसांना दूरध्वनीद्वारे देण्यात आली. मोर्शीचे ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल बुरकुल हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. लगेच त्यांनी या ठिकाणी हिवरखेड येथील मासेमारी करणाऱ्यांना पाचारण केले.तथापि मोर्शी येथील आपदाग्रस्त टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी जलाशयात संयुक्तरित्या तपास सुरू करून अल्फेजचा मृतदेह सायंकाळी 6 वाजता पाण्याबाहेर काढला. मृतदेह शवच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला. या घटनेमुळं अप्पर वर्धा धरण परिसरात खळबळ उडाली.तापी नदीत पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, बेपत्ता मुलाचा शोध सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 2 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे