pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भाजपा जालना महानगरतर्फे अभिवादन कार्यक्रम संपन्न

0 4 0 9 2 8
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.28

भारतीय जनता पार्टी जालना महानगरच्या वतीने महान स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, विचारवंत आणि हिंदुत्वाचे प्रखर पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त (ता.२८) रोजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

हा कार्यक्रम भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. उपस्थितांनी सावरकरांच्या जीवनकार्याला अभिवादन करून त्यांची आठवण काढली.  कार्यक्रमात बोलताना भास्कर आबा दानवे यांनी सांगितले की, “स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर एक प्रतिभावान लेखक, समाजसुधारक आणि राष्ट्रप्रेमाने भारलेला नेता होते. त्यांचं विचारमंथन आजच्या पिढीने समजून घेणे आवश्यक आहे.” या कार्यक्रमाला भाजपा जालना महानगरमधील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा मोर्चा, महिला मोर्चा व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडले.

कार्यक्रम प्रसंगी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, बद्रिनाथ पठाडे, अशोक अण्णा पांगारकर, विजय कामड, सोपान पेंढारकर, सुनिल पवार, सुनिल खरे, अर्जुन गेही, सिद्धिविनायक मुळे, संध्याताई देठे, शुभांगीताई देशपांडे, अरुणाताई जाधव, रवी अग्रवाल, राजेश जोशी, शिवराज जाधव, सय्यद इम्रान डोंगरसिंग साबळे, सोमेश काबलिये, शाम उगले, सतीश अकोलकर, ओम कळकुंबे, अमन मित्तल, तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 2 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे