आगामी काळातील विधानसभा निवडणूका लक्षात घेऊन दहा हजार विद्यार्थ्यांना विद्यावेतन, लाडली बहीण यासारख्या योजना घोषित केल्या.पण राज्यावर ७ लक्ष कोटीपेक्षा अधिक कर्ज असून ४८ हजार कोटी रुपये केवळ व्याज भरत असताना या नवीन योजनासाठी पुन्हा सरकार पैसा आणणार कोठुन?निवडणुकानंतर व्यवहारिक दृष्टीने घोषित केलेल्या योजनांची अंमलबजावणी करणे केवळ अशक्य आहे. अगोदरच नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना पन्नास
हजार रुपये प्रोत्साहन अनुदान शक्य देणे सरकारला शक्य झाले नाही. अद्याप अतिवृष्टीने झालेले नुकसान किंवा दुष्काळी अनुदान याकरीता सरकारकडे पैसे
नाहीत. एकीकडे अगोदरच गॅसचे भाव चौपट केले व आता तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली. म्हणजे १४,४०० वर्षाला वसूल करून ३६०० रुपयांचे
सिलेंडर मोफत देणार अशी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारी योजना असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना एक वर्षापर्यंत अप्रेंटीससाठी पैसे देण्याची
घोषणा केली मात्र पुढे त्यांच्या नोकरीची शाश्वती कोण देणार? अशी बेरोजगारांची फसवणूक होणार आहे. खिशात पैसे नसताना केवळ मोठमोठ्या घोषणा
करून जनतेची फसवणूक केली जात आहे. भाव वाढवून सवलत दिल्याचे सांगून महिला, विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांची केवळ
फसवणूक करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया शिवसेना (उध्दव बाळासाहेब
ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी दिली आहे.