जिल्ह्यात 4 एप्रिल रोजी ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण भरती मेळावा’ चे आयोजन
मेळाव्यामध्ये 204 रिक्त पदांसाठी होणार भरती
जालना/प्रतिनिधी,दि.3
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना अणि मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना यांचे संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 4 एप्रिल, 2025 रोजी मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अंकुशराव टोपे महाविद्यालय, सिरसवाडी रोड, रेल्वे उड्डाण पुलाशेजारी, जालना येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण भरती मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात दहावी/बारावी/आय.टी.आय./बी.ए./बी.कॉम/बी.एससी/ डिप्लोमो/डिप्लोमा ॲग्री/बी.एस.सी. ॲग्री/एम.एस.सी. ॲग्री/एम.बी.ए. इत्यादी पात्रता धारक नोकर इच्छुक उमेदवारासाठी एकुण 204 रिक्त पदे उपलब्ध असून, मुलाखतीसाठी विविध 8 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या रोजगार मेळाव्या मध्ये प्रीम सोल्यूशन प्रा. लि. (सलाम किसान) जालना यांची 18 पदे, प्रीम सोल्यूशन प्रा. लि. जालना यांची 22 पदे, कलश सीड्स प्रा. लि. जालना यांची 25 पदे, एस.बी.आई इन्शुरेंस कंपनी लि. जालना यांची 10 पदे, राजुरी स्टील्स टी एम टी बार्स प्रा. लि. जालना यांची 20 पदे, प्रथम एजुकेशन फाउंडेशन छ. संभाजीनगर यांची 60 पदे, रिध्दी सिध्दी सर्व्हिसेस, जालना यांची 29 पदे, भाग्य लक्ष्मी रोलींग मिल्स प्रा. लि. जालना यांची 20 पदे, असे एकूण 204 रिक्त पदे उपलब्ध आहेत. या मेळाव्यासाठी वरील 8 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार असुन, पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहेत.
या सुवर्ण संधीचा रोजगार इच्छुक जिल्यातील जास्तीत-जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा आणि किमान पाच प्रतीत रिझ्युमे/बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे आणि आधार कार्ड/सेवायोजन नोंदणी छायाप्रतीसह सकाळी 9 वाजता उपस्थित रहावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास
तसेच www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोकरी साधक म्हणून नोंदणी करावी. तसेच, यापुर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील सुधारीत संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन जॉबफेअर टॅबवर क्लिक करुन पंडीत दीनदयाळ उपाध्यायरोजगार मेळाव्यामध्ये जाऊन पात्रते प्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्त पदांसाठी अॅप्लाय करावे, यासाठी काही अडचण आल्यास कार्यालयीन दुरध्वनी व व्हॉटस्अप क्रमांक 02482-299033 वर संपर्क करावा असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गणेश चिमणकर यांनी केले आहे.