pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्ह्याच्या पाठपुराव्याला यश

0 4 0 7 8 0
[sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/चंपतराव ठाकरे पाटिल,दि.24

नायगाव पंचायत समिती येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये गेल्या एक महिन्यापासून रोजगार हमी विभागांमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर उपलब्ध नसल्यामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत येणारे सर्व कामे व मजुरांचे पेमेंट थकीत होते.व रोजगार हमीची सर्व कामे गेल्या एक महिन्यापासून प्रलंबित राहिल्यामुळे रोजगार हमी योजनेचे लाभार्थी व ग्राम रोजगार सेवकांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे पंचायत समिती नायगाव येथे नवीन डाटा एन्ट्री ऑपरेटर रोजगार हमी विभागात मिळावे. म्हणून ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्हा नायगाव च्या वतीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद नांदेड यांना पंचायत समिती नायगाव रोजगार हमीभागात डाटा एन्ट्री ऑपरेटर उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन करण्यात आले होते.त्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या आदेशाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहयो जिल्हा परिषद नांदेड यांच्या आदेशाने नायगाव पंचायत समिती येथे रोजगार हमीभागात नवीन डाटा एन्ट्री ऑपरेटर उपलब्ध करून देण्यात आला. निवेदनात संस्थापक अध्यक्ष अमोल वाकोडे,दत्ता गागलेगावे,शिवराज इंगोले, यांची स्वाक्षरी करण्यात आली. रोजगार हमीचे काम लवकरात लवकर तात्काळ मार्गे लावण्यात यावे यासंदर्भात रोजगार सेवकांनी मिळून गटविकास अधिकारी साहेब यांची भेट घेऊन खालील सर्व रोजगार सेवक बांधवांनी मिळून संतोष इबितदार,प्रल्हाद वारघडे, देविदास डोणगावे, सुरेश वाघमारे,राजू वाघमारे,रामदास पाटील वडजे,जाधव साहेब,गौतम धडेकर सर्व रोजगार सेवकांच्या वतीने गट विकास अधिकारी श्री वाजे साहेब व नवीन डाटा एन्ट्री ऑपरेटर पांचाळ साहेब पंचायत समिती नायगाव यांचा ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती नायगाव च्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्यातील सर्व रोजगार सेवक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 7 8 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे