pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

न्हावा शेवा सी एच ए आधार सामाजिक संस्था आयोजित आधार चषक २०२६ स्पर्धा उत्साहात संपन्न.

रसिक प्रेषक, तरुण वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग. विविध मान्यवराकडून स्पर्धेचे व संस्थेच्या कार्याचे कौतुक.

0 4 0 7 7 8
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27

उरण विभागात सतत होत असलेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबासाठी तसेच दुखापत झालेल्या सीएचए बांधवांसाठी अपघात ग्रस्त निधी संकलनासाठी त्याचप्रमाणे विविध सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने मी मराठी मैदान मोठी जुई,उरण येथे सी एच ए आधार चषकाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला रसिक प्रेषक, तरुण वर्गांचा मोठा उत्तम प्रतिसाद लाभला.दरवर्षी सीएचए आधार चषक या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते व स्पर्धेतील मिळणारी रक्कम अपघातग्रस्तांसाठी व सामाजिक कार्यासाठी वापरली जाते अशा या सीएचए आधार चषकासाठी नागरिकांनी, रसिक प्रेक्षकांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या स्पर्धेला भेट देऊन सदर स्पर्धेचे व संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी न्हावा शेवा सी एच ए आधार सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ रॉकस्टार मोठीजूई ठरला तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ द्विज इलेव्हन पाले ठरला आहे. या संघावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

————————————————————

संस्थेचे विषयी थोडक्यात माहिती :-

उरण तालुक्यात तसेच न्हावा शेवा बंदर परिसरात कस्टम हाऊस एजंट(C.H.A.) चे काम करणारे मराठी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात असून यात स्थानिक भूमिपुत्र मोठ्या प्रमाणात काम करीत आहेत. सीएचए (कस्टम हाऊस एजेंट ) हे जेएनपीटी व न्हावा शेवा परिसरातील विविध कॅन्टेनर, ट्रक, टेम्पो, जड अवजड मालवाहू वाहने यांच्या कागदपत्राचे पासिंगचे(एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचे)काम करतात.रात्रंदिवस काम करून, आपला जीव धोक्यात घालून संसार चालवितात व जमेल तेवढं समाजकार्य करतात.अशा या स्थानिक भूमिपुत्र मराठी तरुणांना न्याय मिळावा त्यांचे अधिकार व हक्क त्यांना मिळावेत अपघातग्रस्तांना मदत करता यावी यासाठी न्हावा शेवा सी एच ए आधार सामाजिक संस्थेची स्थापना झाली.आज पर्यंत अनेक सामाजिक कार्य या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली आहेत.आजपर्यंत अपघातग्रस्त व अपघातात मृत्यू पावलेल्या पूर्व विभागातील अनेक व्यक्तींना या संस्थेच्या माध्यमातून लाखो रुपयाची मदतही करण्यात आली आहे.उरण विभागात सतत होत असलेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबासाठी तसेच दुखापत झालेल्या सीएचए बांधवांसाठी अपघात ग्रस्त निधी संकलनासाठी सदर संस्था नेहमी अग्रेसर असते.त्याचप्रमाणे विविध सामाजिक कार्यही या संस्थेच्या माध्यमातून होत असतात.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 7 7 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे