pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

हरवलेल्या मुलगा आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

0 4 0 7 8 4
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.11

जिल्ह्यातील कारला ता.जालना येथील विकास गजानन सोळंके हा वय 16 वर्षे 7 महिने असलेला मुलगा हरवल्याची नोंद मौजपूरी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आली आहे. हरवलेल्या मुलाची उंची 5 फुट 9 इंच असून रंग गोरा, चेहरा लांबट तसेच उजव्या गालावर पांढरा चट्टा, कटींग हाप साईड, पोशाख निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट व काळे ठिपके असलेला पांढरा शर्ट, डाव्या पायात काळा धागा बांधलेला असून पायात राखाडी रंगाची सँडल असून त्याला भाषा मराठी येते. तसेच त्याला वेल्डींग कामाचा अनुभव आहे. तरी या वर्णनाचा मुलगा कोणास आढळून आल्यास मौजपूरी पोलीस ठाणे, ता.जि.जालना येथे पो.स्टे.मौजपूरी सहा.पोलिस निरीक्षक मो.9370800100 आणि पोलिस हेड कॉंन्स्टेबल श्री. देशमुख,मो.9284106820 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहा.पोलीस निरीक्षक , पोलीस ठाणे मौजपूरी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 7 8 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे