साईप्रसाद परिवाराच्या आठवा विवाह सोहळ्यात अकरा जोडपी विवाह बंधनात

नांदेड/प्रतिनिधी,दि.12
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्व सामान्य कुटुंबाला विवाह सोहळा करण्यासाठी कर्ज काढणे आणि फेडणे अवघड चालले असून या काळजीने टोकाचे पाऊल उचलले जात आहे. सर्व सामान्य कुटुंबातील अडीअडचणी लक्षात घेऊन आपण आपले कर्तव्य पार पाडत काही तरी केले पाहिजे या हेतूने प्रेरित होउन देश विदेशातील तिस हजारांहून अधिक दानशूर व्यक्तींच्या दायीत्वाने बिगर नौंदणीकृत असलेल्या नांदेड जिल्ह्यासह आजुबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे दोन वेळा जेवण व दिवसभर शुद्ध पाण्याची अखंडपणे निस्वार्थी सेवा सुरू ठेवत अडचणीत असलेल्या गरजु कुटुंबासाठी आशेचा किरण ठरलेल्या साईप्रसाद परिवाराने नांदेड सिडको येथील सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या सुप्रसिध्द गुंडेगावकर मंगल कार्यालयात नेहमी प्रमाणे ू अध्यक्ष सचिव असा कोणताही चेहरा समोर न येता आठवा विवाह सोहळ्यात अकरा विवाह संपन्न झाले.
वधुवरासह पाहुणे नातेवाईक मंडळी साठी स्वागतासह नाष्टा, जेवण चहा पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी साईप्रसाद परिवाराच्या वतीने स्वयंसेवक मंडळी यांनी घेतली होती. ू वधुवरांना गाधी पलंग आलमारी,कुलर, मणी मंगळ सुत्र,जोडवे चैन, कपडे,सह संसार उपयोगी सर्व साहित्य भेट दिली. विवाह सोहळा वेळेत ठरल्याप्रमाणे ब्राह्मणांच्या उपस्थितीत मधुर वाणीतून सर्व विधीने संपन्न झाला. गरजु कुटुंबासाठी दिपावली नंतर पुढील विवाह सोहळा आयोजित केला असल्याचे साईप्रसाद परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.