जागतिक युवा दिना निमित्त कौशल्य सप्ताहाचे औचित्य साधून करीअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.8
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना या कार्यालयामार्फत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त दि. 7 जुलै ते 15 जुलै या कालावधीत कौशल्य सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.
जागतिक युवा कौशल्य दिन सप्ताहाच्या निमित्ताने दि. 7 जुलै, 2025 रोजी मातोश्री स्किल डेव्हल्पमेंट प्रा.लि. जालना येथील कौशल्य विकास प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी करीअर व व्यवसाय मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर सत्रास 91 उमेदवार उपस्थित होते. या प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना चे समुपदेशक डॉ. अमोल परिहार यांनी विद्यार्थ्यांना करीअर व व्यवसाय विषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भुजंग रिठे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, आत्माराम दळवी व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास काळे व प्रकाश उघडे या प्रसंगी उपस्थित होते.
