pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कुमार जिल्हा अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

0 4 0 7 6 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.13

जालना जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या व शिवशक्ती क्रीडा मंडळ टेंभुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने २५ नोव्हेंबर २०२५ ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पुणे येथे होणाऱ्या कामर कुमारी राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी स्पर्धेसाठी जालना जिल्हा कुमार अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक १५/११/२०२५ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता स्थळ : कडूबा सपकाळ क्रीडा नगरी ,जाफराबाद रोड HP पेट्रोल पंप च्या जवळ, टेंभुर्णी ता. जाफ्राबाद करण्यात आलेले आहे तरी जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी मुलांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान जालना जिल्हा कबड्डी *संघटनेचे संस्थापक सचिव नंदकिशोर खर्डेकर अध्यक्ष माधवीताई काळे उपाध्यक्ष अक्षय भैय्या गोरंटयाल, डॉ देवेश जी पाथ्रीकर सचिव प्रशांत तेलगड यांनी केले आहे*
*या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंचे वजन 75 किलो ग्रॅम खालील व वय २० वर्षाखालील असावे जन्मतारीख 18. 01. 2006 किंवा त्यानंतरची असावी*
वयाच्या दाखल्याबाबत महत्त्वाची सूचना
१)यु डायस नंबर व स्टुडन्ट आयडी असलेला बोनाफाईड व निर्गम उतारा मुख्याध्यापक यांनी अर्धसाक्षांकित केलेला असावा
२)आधार कार्ड (ओरिजनल अद्यावत केलेले असावे)
3)पासपोर्ट साईज चार फोटो
अधिक माहितीसाठी संघटनेचे सदस्य राहुल वाहुळे,बाबासाहेब मंडाळे , संजय येळवंते ,रवींद्र ढगे, राजूभाऊ थोरात ,संतोष नागवे, यांच्याशी संपर्क करावा. स्पर्धा संदर्भात ओमराज उखर्डे 9607267651,सोमेश मघाडे 7620481323,कृष्णा बेंद्रे 84858 40194. यांच्याशी संपर्क करावा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 7 6 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे