pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय वशेणी ता. उरण येथे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.

0 4 0 7 6 1
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.12

उरण तालुक्यातील प्रा. जयदास पाटील शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमिक विद्यालय वशेणी येथे इयत्ता ५ वी ते १० वीच्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी गणवेश वाटप करण्यात आले .स्व.संगीता मच्छिंद्र ठाकूर फाउंडेशन धुतूम तर्फे माजी रा.जि .प .सदस्या कुंदाताई वैजनाथ ठाकूर आणि माजी रा.जि. प. सदस्य वैजनाथ मच्छिंद्र ठाकूर यांच्या सौजन्याने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले .या कार्यक्रमा प्रसंगी ऍड .अविनाश ठाकूर उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिरकोन, प्रवीण राम ठाकूर पनवेल तालुका अध्यक्ष शिंदे गट, समाधान कृष्णा कटेकर अध्यक्ष धुतुम ग्रामस्थ मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गट,सागर ठाकूर समाजसेवक,गुरुनाथ तांडेल समाजसेवक, प्रा. जयदास पाटील संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील ,संस्थेचे सचिव राकेश पाटील तसेच महात्मा गांधी विद्यालय दिघोडेचे सेवानिवृत्त प्राचार्य नाथा नारायण नाईक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पाहुण्यांच्या शुभहस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आणि सरस्वती मातेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वैजनाथ ठाकूर यांनी भूषविले.नाथा नाईक यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना आवाहन केले की त्यांनी विद्यालयाचा निकाल १०० % लावून विद्यालयाचे नाव तालुक्यात केले पाहिजे. प्रवीण ठाकूर यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी ११२ ताटं दिली.वैजनाथ ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की या विद्यालयाचा चेहरा मोहरा बदलायला हवा .त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. त्यांनी संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांना विद्यालयाच्या विकासाबाबत आश्वस्त केले. विद्यालयाचे ग्रंथपाल विश्वनाथ केणी यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान लाभले.
कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण पाटील यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 7 6 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे