pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या विविध नियुक्त्या जाहीर.

0 4 0 7 6 1
[sp_wpcarousel id="1375"]

सिंधीकाळेगाव/प्रतिनिधी,दि.14

राष्ट्रीय बंजारा परिषद या सामाजिक तथा सांस्कृतिक संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक किसनभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली परिषदेचे जालना जिल्हाध्यक्ष तथा जालना तालुक्यातील सोमनाथ येथील माजी सरपंच राजेश पवार यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात काल बंजारा समाजातील सामाजिक तथा सांस्कृतीक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बंजारा परिषदेच्या विविध पदावर नियुक्त्या करुन त्यांना नियुक्ती पत्र दिले. यामध्ये जालना तालुक्यातील बाजीउम्रद येथील सरपंच अनिल चव्हाण यांची परिषदेच्या जिल्हाउपाध्यक्ष, वखारी येथील माजी सरपंच गणेश राठोड यांची तालुका सरचिटणीस, मांगीलाल पवार यांची तालुका उपाध्यक्ष तर वडगांव येथील आनंद चव्हाण यांची तालुका सरचिटणीस पदी तर ऋषींधर पवार यांची तालुका संघटकपदी नियुक्तीचे पत्र देवून नियुक्ती केली आहे. याप्रसंगी मराठवाडा सचिव संदीप राठोड, सुरेश एखंडे, राम राठोड, श्याम पवार, दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण राठोड यांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 7 6 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे