पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केली जालना शहरातील विविध भागात पाहणी
जालना/प्रतिनिधी, दि.17
मराठवाडा मुक्तिसंग्राम वर्धापन दिनानिमित्त जालना शहरातील टाऊन हॉल येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी जालना शहरातील महापालिकेसमोरील परिसरातील शिवशक्ती ग्रीन सिटीत अतिवृष्टीने सखल भागात पावसाचे पाणी साचलेल्या भागातील रहिवासी भेट घेवून विचारपूस केली तसेच रेल्वे स्थानकाशेजारील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथील घरामध्ये पाणी साचलेल्या भागाची पाहणी केली. अतिवृष्टीने घरांचे खुप मोठे नुकसान होवून घरात पाणी शिरले आहे. या संकटात सापडलेल्या रहिवाशांना अन्न व इतर आवश्यक बाबी पुरविण्याबाबत जिल्हा प्रशासनाला नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. यावेळी आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.



