pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नितेश पाटील यांची पिरकोन ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन!!!

0 4 0 7 6 4
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.08

उरण तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश गजानन पाटील यांची उरण तालुक्यातील पिरकोन ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी नितेश पाटील यांची पिरकोन ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष किरीट पाटील, उरण तालुका इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत तसेच उरण पूर्व विभागातील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.काँग्रेसचे कट्टर, प्रामाणिक, एकनिष्ठ कार्यकर्ते व सामाजिक कार्य करणाऱ्या नितेश पाटील यांची पिरकोन ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी निवड झाल्याने सर्वच स्तरातून नितेश पाटील यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 7 6 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे