pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

0 4 0 7 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.25

ऑलिंपिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जालना जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा संघटना, शैक्षणिक संस्था, क्रीडा मंडळ, एकविध खेळ संघटना, क्रीडा अकादमी, संस्था व मंडळाच्या माध्यमातून राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा व उपक्रम दि.15 व 16 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आले.
राज्य क्रीडा दिनानिमित्त बुधवार दि. 15 जानेवारी 2025 रोजी व्याख्यान, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार व गौरव, क्रीडा क्षेत्रातील संधी, नामवंत खेळाडूसोबत संवाद, फुटबॉल स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा, तलवारबाजी स्पर्धा, योग स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, लॉन टेनिस स्पर्धा, टेनिक्वाईट स्पर्धा घेण्यात येवून पुरस्कार वितरण करण्यात आले. तर गुरुवार दि.16 जानेवारी रोजी रॅलीसह मॅरेथॉन स्पर्धा तसेच विविध क्रीडा अकादमींना भेटी देण्यात आल्या आहेत. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 7 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे