तोष्णीवाल महाविद्यालयात परत वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांची सेवा
हिंगोली/प्रतिनिधी, दि.2
सेनगाव येथील तोष्णीवाल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक 30 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशीच्या पंढरपूर वारीला जे वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात ते भाविक पूर्वापार आवर्जून परतवारी एकादशीला म्हणजेच कामिनी एकादशीला संत नामदेवांचे जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव येथे दर्शन घेऊन वारीची परि नवीनक्रमा पूर्णत्वास नेतात त्याच अनुषंगाने येलदरी ,सावंगी, हिवरखेडा खडकी आदी पंचक्रोशीतील शेकडो नामदेव भक्त प्रतिवर्षीप्रमाणे पायी दिंडीचे आयोजन करतात .उपरोक्त दिंडीचा मुक्काम महाविद्यालयात असतो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांचे यशोचित स्वागत केले रात्रीच्या भोजनाची उत्तम व्यवस्था केली .याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी वारकऱ्यांना आरोग्य विषयक बाबी सांगत प्रबोधन केले.



