19 वर्ष वयोगटातील तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत राजुरेश्वर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयाचे यश
विष्णू शेलार या विद्यार्थ्याने मारली बाजी
बदनापूर/प्रतिनिधी, दि.10
आज( दि.9) शुक्रवार या रोजी झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये राजुरेश्वर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय नानेगाव ता. बदनापुर जि.जालना या विद्यालयातील वर्ग 12 वी कला चा विद्यार्थी शेलार विष्णू बंशीराम या विद्यार्थ्याने पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये 19 वर्ष वयोगटातून तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल संस्थेचे सचिव मा.डॉ.राहुल पाटील डोंगरे आमचे मार्गदर्शक श्री पांडुरंग तात्या डोंगरे बाजार वाहेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री गंगावणे सर तसेच विद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले व जिल्हास्तरीय निवड झाल्याबद्दल त्याला शुभेच्छा दिल्या.



