pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आदिवासी समाजातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल  

0 4 0 4 6 5
[sp_wpcarousel id="1375"]

 जालना/प्रतिनिधी,दि.4

 केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत आदि कर्मयोगी अभियान योजनेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील 24 गावातील आदिवासी समाजाच्या नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहत आयोजित प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान बैठकी दरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम., जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सविता चौधर, उप मुख्य कार्यकारी पंचायत उदयसिंग राजपूत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन आर. डी. तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता एल. बी. बारगिरे, प्रकल्प अधिकारी श्रीमती चेतना मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी संबंधित विभागातील अधिकारी यांना सदर योजनेंतर्गत पुढील प्रमाणे सामुहिक विकासाच्या योजना राबविणे अपेक्षीत असल्याचे सांगितले. यामध्ये आवास योजना, जल अपुर्ती साधने विहिरी, हॅन्डपंप, ट्युबवेल, पाण्याच्या टाक्या, जलाशये, नहरे इत्यादी, आरोग्य व पोषण, शिक्षण, रस्ते व दळणवळण, वीजेची जोडणी, सामुदायीक व धार्मिक सुविधा मध्ये मंदीर, मस्जिद, चर्च किंवा अन्य धार्मिक स्थळे विकास, दूरसंचार साधनामध्ये टपालघर, टेलीफोन बुथ, मोबाईल टॉवर, रेडीयो सूचना बोर्ड, बाजारपेठ व व्यापार साधने, स्वच्छतागृहे, सामुदायीक शौचालये, मलनिस्सारण योजना, कृषि सहायता मध्ये पशुशाला, अन्न गोदाम, सिंचन पंपाचे दुरुस्ती, मनोरंजन यामध्ये खेळ मैदान, सांस्कृतिक सण साजरे करण्याचे ठिकाण, मोकळे मैदानाचा विकास सेवा साधने यांचा लाभ संबंधित लाभार्थीना उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले.

तसेच  तालुका मास्टर ट्रेनरची नियुक्ती करून जिल्हा प्रोसेस लॅब गठीत करणे, अनुसूचित जमाती मधील विद्यार्थांसाठी वसतीगृह उभारणीचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना सादर करणेबाबत निर्देश दिले, दूरसंचार विभागाने संबंधित गावामध्ये दूरसंचार जोडणीबाबत तातडीने सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करावा. सदरील कार्यक्रमाशी संबंधित सर्व सहभागी यंत्रणांनी एकत्रितपणे गावनिहाय शिबीरांचे आयोजन करुन, लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा. आदिवासी समाजातील कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष मोहीम राबविणेबाबतच्या सूचना ही श्रीमती मित्तल यांनी यावेळी दिल्या.

यावेळी तहसीलदार परतुर श्रीमती प्रतिभा गोरे, जिल्हा कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती संगिता भागवत, गटविकास अधिकारी परतुर एन.टी.खिल्लारे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी आय. सी. डी. एस. श्रीमती कोमल कोरे, गटविकास अधिकारी भोकरदन महेंद्र साळवे, गटविकास अधिकारी अंबड श्रीमती ज्योती लबडदेवी, गटविकास अधिकारी बदनापूर श्रीमती ज्योती राठोड, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. पी. डी. चौधरी, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जालना पी. बी. बनसावडे, उप कार्यकारी अभियंता डी. पी. घोरपडे, सहा आयुक्त पंचायत डॉ. सु. दी. माने, मेढाचे व्यवस्थापक एन. जी. जगताप, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ भरत वानखेडे, भागवत कदम, श्रीमती माने मॅडम,  सोमनाथ थोरवे, भारत चव्हाण, श्रीमती अनुपमा मस्के, बिराप्पा पाटील, श्री बोराडे यांच्यासह अन्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 6 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे