pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जाणता राजा

शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी ||

0 3 1 0 9 9

 

                    || जाणता राजा ||

 

शिवरायांचे आठवावे रुप |

शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी ||

 

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजे, शिवबा, शिवराय, शिव, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात त्यांचा जन्मदिवस हा ‘शिवाजयंती’ म्हणुन साजरा होतो. शिवाजी महाराजांच्या जन्माने आपली मातृभूमी पावन झाली. राजमाता जिजाऊच्या गुणांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले. शिवाजी महाराजांनी सर्व जातीच्या लोकांना मावळ्यांच्या रुपाने एकत्रीत केले. सुव्यवस्थित आणि शिस्तबध्द प्रशासन स्थापन केले. ‘स्वराज्य’ निर्माण केले. गनिमी कावा युद्धाची शैली, शिवसुत विकसीत केले. महाराजांनी काबीज केलेला पहिला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्यानंतर त्यांनी 360 किल्ले जिंकले. शिवछत्रपतींनी आपली तलवार कधीही निष्पाप लोकांच्या रक्ताने रंगू दिली नाही. नवीन आरमार निर्मीती, नवीन कायदे करणे, नवी शहरे बसवणे, स्वधर्म स्थापन करुन त्याचे ऐश्वर्य वाढविले. शिवाजी महाराजांचे वर्तन न्यायाचे, नीतिचे, पराक्रमाचे व परधर्म सहिष्णुतेचे होते. शिवछत्रपतींनी कधीही रुढी परंपरांना, अंधश्रध्दांना आपल्या जीवनात स्थाने दिले नाही. महाराजांनी कित्येक लढाया अमावस्येला केल्या आणि ते जिंकले सुद्धा वडील शहाजी राजेंचे निधन झाल्यावर त्यांनी जिजाऊ माँ साहेबांना सती जाऊ दिले नाही.

महाराजांच्या विरोधात लढणारे मोगल, निझाम, आदिलशहा, कुतुबशहा हे धर्माने मुस्लिम होते, पण शिवछत्रपतींनी कधीही मुस्लिमांचा द्वेष केला नाही. याउलट नुर खान बेग, आरमार प्रमुख दर्यासारंग, बाबा याकुत, मदारी मेहतर हे तर त्यांचे निष्ठावंत सरदार होते. महाराज हे मुस्लिमांचे शत्रू नव्हते. तर ते शत्रू होते अन्यायाचे, अत्याचारी प्रवृत्तीचे, शिवाजी महाराजांवर तलवारी उपासल्या, तेंव्हा ते वार आपल्या छातीवर झेलणारे वीर मुस्लिमच होते. हा इतिहास नाकारता येणार नाही. छत्रपतींनी न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यावर आधारलेले निधर्मी आदर्श स्वराज्य निर्माण केले होते. महाराजांचा लढा हा राष्ट्रीयत्वाचा होता ! महाराष्ट्राचा हा ‘जाणता राजा’ प्रत्येक पिढीसाठी एक प्रेरणास्त्रोत राहिला आहे. आणि पूढील पिढीसाठी देखील राहणार आहे. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. आपण त्यांच्यातील एकतरी गुण आमलात आणावा व तो अंगीकारावा, तरच खऱ्या अर्थाने आपल्याकडून शिवजयंती साजरी होईल. चला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर मार्गक्रमण करण्याचा थोडा तरी प्रयत्न करु यात…!

स्वाती कोलते आग्रे (शिक्षिका)

 

 

 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 0 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे