शेत तळ्यात बुडुन तिनं बालकांचा मृत्यू जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील घटना
भोकरदन/संजीव पाटील,दि.4
जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथे काल सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास महादेवाला दर्शन साठी जातो असे सांगितले डोलखेडा रोडवरील महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यश अनिल जोशी वय वर्षे 14 वर्ष,रोहन रमण जोशी वय 4 वर्षे, आणि कु.दिपाली रमण जोशी वय 9 वर्षे .हे तिघे भावंडं घरातुन बाहेर पडले.संध्याकाळ झाली तरी घरी आलेच नाहीत.त्यामुळे घरच्यां लोकांकडुन त्यांचा शोध सुरू होता.त्यांचे मृत्यू देह आज दिनांक 3 जुन रोजी वरुड येथील शेत तळ्यात पाण्यावर तरंगत असतांना दिसले .या घटने नंतर वरुड गावावर शोककळा पसरली आहे. माझी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे भोकरदन जाफराबाद मतदार संघाचे आमदार संतोष भाऊ दानवे यांनी या घटने बद्दल दुःख व्यक्त केले असुन कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.यातील यश यांच्या आईचे माहेर सुरंगली ता भोकरदन येथील आहे. सुरंगली गावातही या घटने बद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.यश हा एकुलता एक मुलगा होता.



