pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये मनाई आदेश लागू

0 4 0 4 6 7
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.15

जिल्ह्यात दिनांक 24 मार्च 2024 रोजी होळी व दि.25 मार्च रोजी धुलीवंदन सण साजरा होणार आहेत. तसेच रमजान महिना सुरु असून दि. 29 मार्च रोजी गुड फ्रायडे सण साजरा होणार आहे. तसेच दिनांक 1 ते 26 मार्च 2024 पर्यंत चालणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षा सुरु झाल्या असून परीक्षा केंद्रासमोर मोठया प्रमाणात गर्दी असते. तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण बचाव व धनगर समाज एस.टी. प्रवर्गात समाविष्ठ करावे या अनुषंगाने जालना जिल्हयात विविध प्रकारचे आंदोलन कार्यक्रम सुरु आहेत. त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. तसेच सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द गटबाजी व आरोप प्रत्यारोप विविध कारणांवरुन सुरु आहे. तसेच शेतक-यांचे विविध मागण्यासाठी विविध संघटनाकडुन आत्मदहन, उपोषण, धरणे मोर्चे, निर्दशने, रास्तारोको, ईत्यादी सर्व प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने त्या अपर जिल्हादंडाधिकारी सोहम वायाळ यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये अधिकाराचा वापर करुन दि.16 ते 29 मार्च 2024 या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
आदेशानूसार  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे. तसेच हा आदेश कामावरील कोणताही अधिकारी- कर्मऱ्यांना लागू होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागातील पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू होणार नाही. हा आदेश दि.16 मार्च 2024 रोजीचे 6 वाजेपासून दि.29 मार्च रोजीचे 12 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 6 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे