जालना येथे मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.23
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित व जालना जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत विशेष घटक प्रवर्गातील युवक-युवतींसाठी सन 2024-25 अंतर्गत मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जालना येथे करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील उमेदवारांनी कापडी पिशवी व पेपर बॅग तयार करण्याच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश सारणीकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील युवक-युवतींनी उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करावा हा प्रशिक्षण आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. कापडी पिशवी व पेपर बॅग तयार करण्याबाबत एक महिना कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षणामध्ये साधी बॅग, समोसा बॅग, फोल्डींग बॅग, बलुन बॅग, चौकोनी बॅग, प्रवासी बॅग, बटवा, कापडी पर्स, व विविध पेपर बॅगचे प्रकार इत्यादीचे प्रात्याक्षिकाद्वारे सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण संपुर्णतः मोफत असून यासाठी किमान सातवी पास, वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष पात्रता धारक इच्छुक लाभार्थीना प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गजानन गाढे (मो.9579264868) किंवा विनोद तुपे दुरध्वनी क्र.02482- 220592 यांच्याशी दि.31 जुलै 2024 पर्यंत संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे