pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्ताने आयोजित रोजगार मेळाव्यात 182 उमेदवारांची निवड

0 4 0 4 8 1
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.15

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारदि. 15 जुलै,2024 रोजी जालना येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत “जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय   रोजगार मेळावा  संपन्न झाला. या रोजगार मेळाव्यात  182 उमेदवारांची विविध कंपन्यामध्ये रोजगारासाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत दि. 15 जुलै, 2024 रोजी बेरोजगार उमेदवारांसाठी जालना येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत “जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडीत दीनदयाळ उपाध्याय   रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे  उदघाटन प्राचार्य डॉ.प्रविणकुमार उखळीकर व उपप्रचार्य श्रीमती शेळके यांच्या हस्ते झाले.

 रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यामध्ये 295उमेदवारांनी सहभाग नोंदवला. 295 उमेदवारानी विविध उद्योजकाकडे मुलाखती दिल्या असुन 171 पुरुष आणि 11 स्त्रि उमेदवारांची  मेटारोल ईस्पाट प्रा.लि.जालना-15, विक्रम टी प्रोसेसर प्रा. लि, जालना-10, एस.आर. जे पित्ती स्टिल प्रा. लि,जालना-05,एन.आर. बी. बेअरिंग्ज लि, जालना-20,भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रा. लि, जालना-05,ॲप्रोक्रॉप इंजिनिअरींग प्रा.लि.जालना-20, भूमी कॉटेक्स इंडस्ट्री प्रा. लि. जालना-05, नव-भारत फर्टिलायझर  लि. छत्रपती संभाजीनगर-05,ओम साई मॅनपॉवर प्रा. लि. जालना-24, कॅनपॅक इंडिया प्रा.लि.  छत्रपती संभाजीनगर-31,  पिपल ट्री व्हेंचुअरप्रा. लि. नागपुर-32,    क्लॅड मेटल, जालना- 10  याप्रमाणे एकुण 182  उमेदवारांची विविध आस्थापनांनी प्राथमिक निवड केली.

प्रास्ताविक सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.अमोल परिहार  यांनी  करुन आभार सुरेश बहुरे यांनी मानले. रोजगारमेळावा यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  कार्यालयाचे अमोल बोरकर, आत्माराम दळवी, प्रदिप डोळे, कैलास काळे, सोमेश्वर शिंदे, तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालनाचे प्रशिक्षणार्थी सल्लागार ए. एस. धाबे व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 8 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे