जागतिक स्तरावरील नामांकित व खडतर असलेल्या कॉम्रेड मॅरेथॉन ही 87 किलोमीटरची स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत नुकतीच पार पडली. यात जालन्याचे जितेंद्र अग्रवाल यांनी सहभाग नोंदवला याबद्दल फॅब रनर ग्रुपने त्यांचा पांजरापोळच्या मैदानावर सत्कार केला. सत्कारला उत्तर देताना अग्रवाल म्हणाले, ही स्पर्धा पूर्ण करणे म्हणजे ईश्वराची कृपा असावी लागते आणि मित्राच्या शुभेच्छाही पाहिजेत. अतिशय खडतर अशी ही स्पर्धा त्यांनी 11 तास 42 मिनिटात पूर्ण केली व जालन्याचा डंका अटकेपार पोहोचवला. या स्पर्धेत सहभागी होणारे जालन्याचे ते पहिलेच यशस्वी धावपटू आहेत. यावेळी फॅब ग्रुपचे अशोक राठी, अर्जुन जगताप, प्रशांत भाले, डॉ. दिलीप दिवटे, संजय अंपाळकर, किसन जाधव, धनसिंह सूर्यवंशी, अॅॅड.ईश्वर बिलोरे, राम हलनोर, काशिनाथ मोरे, श्रीराम सर, दिनेश अंधेवार, अजय सिंगला, भास्कर पवार, मनोज कुमकर, धर्मेश उजवणे, राजू सैनी, डॉ. सतीश शेकडे, केशर सिंग राजपूत, कैलास जाधव, विष्णू पाटेकर, बलराज शिराळे, अनिल मालपाणी, मिलिंद खेरुडकर, संजय रुणवाल, संजय शेजुळ, हितेंद्र त्रिवेदी, नागेश मापारी, मिलिंद वासनिक, दशरथ पडूळ, विजय लोळगे, संदीप ढगे व इतर क्रीडा प्रेमी उपस्थित होते.