pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

“एक झाड, अनेक उपयोग” – पर्यावरण दिनी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचा हरित संदेश

0 4 0 4 5 8
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.5

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिनांक ५ जून २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता स्त्री रुग्णालय, गांधीचमन, जालना येथे “एक पेड माँ के नाम” या भावनिक आणि प्रेरणादायी संकल्पनेखाली वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.  या उपक्रमांतर्गत फळझाडे, औषधी वनस्पती व छायादायक झाडांची लागवड करण्यात आली. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सहभागी सर्वांनी वृक्षसंवर्धनाचा शपथविधी केला व हिरवे भविष्य घडवण्याचा संकल्प केला.

यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करताना, “वृक्ष ही निसर्गाची संपत्ती असून भावी पिढ्यांना शुद्ध हवामान आणि हिरवे जग सोडण्यासाठी आजच झाडे लावणे आणि त्यांचे जतन करणे आवश्यक आहे,” असे थोडक्यात मार्गदर्शन केले.

यावेळी विमलताई आगलावे, विजय कामड, बद्रिनाथ पठाडे, अशोक अण्णा पांगारकर, सतीश जाधव, सोपान पेंढारकर, संध्याताई देठे, अरुणाताई जाधव, महेश निकम, संजय डोंगरे, प्रा.राजेंद्र भोसले, वैशाली बनसोड, पुष्पा मेत्रे, आशा भाले ,रेणुका बोटुळे, रेणुका फुलमामडीकर, विष्णू बापू डोंगरे, गोवर्धन कोल्हे, सिद्धेश्वर हाजबे अप्पा, सुनिल पवार, सुहास मुंडे, सोमेश काबलिये, इम्रान सय्यद, प्रशांत गाडे, सोमनाथ गायकवाड, कृष्णा गायके, ओम कळकुंबे, गणेश खरात, शाम उगले, राजाराम जाधव, गौरव गोधेकर तसेच रुग्णालयाचे प्रमुख डॉ. गवारे व त्यांच्या आरोग्यसेविका व कर्मचारीवृंद कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी झाले.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 5 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे