pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

माजी आ. मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते द्रोणागिरी युवा महोत्सवाचे उदघाटन

0 4 0 5 0 2
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21

खेळाडू व कलाकारांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून दरवर्षी द्रोणागिरी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा दिनांक २० डिसेंबर २०२३ ते २४ डिसेंबर २०२३ या दरम्यान बोकडविरा चारफाटा (एनएमएसईझेड मैदान ), पेट्रोल पंप जवळ, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे रायगड जिल्हास्तरीय २३ वा युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी या महोत्सवाचे उदघाटन शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते झाले. सर्वप्रथम श्री द्रोणागिरी देवी (करंजा )येथून क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन, सायंकाळी ४ वा. क्रीडा ज्योतीचे क्रीडा संकुलात आगमन,४:१५ वा. ध्वजारोहण,४:३० वा. क्रीडा महोत्सवाचे उदघाटन,४:४५ वा. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व मार्गदर्शन असे कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी द्रोणागिरी युवा महोत्सवाचे उत्तम आयोजन व नियोजन केल्याने द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरानींही आपापले मनोगते व्यक्त केली.१२० हुन अधिक वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांचा( स्पर्धांचा )या महोत्सव मध्ये समावेश असल्यामुळे क्रीडा रसिक प्रेषकांनीही या महोत्सवला मोठया प्रमाणात हजेरी लावली होती. राजकारण विरहित हे युवा महोत्सव असल्याने सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था संघटना यांचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार मनोहरशेठ भोईर, जेएनपीटीचे माजी विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील, जेष्ठ साहित्यिक एल बी पाटील, कवीश्री अरुण म्हात्रे,जेष्ठ गायक भालचंद्र म्हात्रे,जेष्ठ पत्रकार मिलिंद खारपाटील,द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत,महिला विभाग प्रमुख वैशालीताई घरत,उपाध्यक्ष मनोज पडते, खजिनदार शिवेंद्र म्हात्रे, सल्लागार नरेश म्हात्रे, सचिव दिलीप तांडेल, क्रीडा प्रमुख भरत म्हात्रे व द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 0 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे