pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सामाजिक न्याय विभाग जालना काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी प्रा. रविंद्र गाडेकर

0 4 0 4 9 1
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/जितेंद्र गाडेकर,दि.11

सामाजिक न्याय विभाग जालना काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदी प्रा. रविंद्र गाडेकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अशोक जाधव यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देवून नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मा. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, ॲड. बदल गायकवाड आदींची उपस्थिती होती. काँग्रेस पक्षाच्या अधीन राहून पक्ष बळकटीकरण व पक्षाची ध्येय धोरण पुढे नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रा. रविंद्र गाडेकर यांनी या प्रसंगी सांगितले.
या निवडीबद्दल प्रदेश प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील, मा. आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र राख, प्रा. सत्संग मुंढे, शहराध्यक्ष शेख महेमूद, जावेद बेग, करीम बिल्डर, ॲड. देवराज डोंगरे, महिला काँग्रेसच्या नंदाताई पवार, सुषमाताई खरात, राहुल गांधी विचार मंच चे जिल्हाध्यक्ष जितेंद्र गाडेकर, त्रिंबक पाबळे, वसंत जाधव, नारायण वाढेकर, सरपंच अरूण घडलिंग, अर्चनाताई गाडेकर, राम चव्हाण, कलिम मनियार, शेख चाँद, राम चव्हाण, भानुदास लहाने,प्रभाकर भाटसोडे, आनंद तायडे, प्रा. शिवाजी लहाने, प्रा. वसंत उगले, शाम ढाकणे, रामचंद्र वाघमारे, पंडीत खरात, महेश दसपुते, निलेश दळे, सोनाजी खरात, राहुल गाडेकर, उषाताई बोर्डे आदींनी शुभेच्छा देवून स्वागत केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 9 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे