भारती गाढे हिचे गोळा फेक स्पर्धेत मध्ये विशेष प्राविण्य
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.8
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी भारती विष्णू गाढे हिने गोळफेक व थाळीफेक खेळात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी पात्र झाली आहे. त्याबद्दल तिचे संस्थेचे सचिव मा.सभापती श्री. लक्ष्मणराव पाटील दळवी, अध्यक्ष श्री. योगेश पाटील दळवी, संस्थेचे पदाधिकारी सौ.कासाबाई दळवी, दिनेश दळवी, गिता ताई गावंडे व प्राचार्य श्री.पंढरीनाथ शिंदे सर, क्रीडा शिक्षक श्री.भरत सिरसाट सर , श्री.राजू मिरगे सर, प्रशिक्षक श्री.मंगेश रगडे सर, प्रशासकिय अधिकारी आनंद वाघ सर तालूका क्रीडा संयोजक श्री .जंजाळ सर, श्री. अमोल मिरगे सर, श्री. चिकटे सर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.



