pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

युनायटेड ग्लोबल फेडरेशनचा स्तुत्य उपक्रम.

0 4 0 4 5 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.28

 

टेंभुर्णी शहरातील नामांकित नवभारत शिक्षण संस्थेचे श्रीमती.जे.बी.के विद्या लय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयात दि.२६नोव्हें २०२५रोजी विद्यालयातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. युनायटेड ग्लोबल फेडरेशनचे दुर्गेश विष्णू बनकर, विशाल अनुराग जाधव,उमेश गिराम, मिलिंद बोर्डे,विशाल नवले,प्रेमानंद जाधव, प्राचार्य.विष्णू जाधव,एस.बी.बोरकर,प्रा.डि.एस.देशमुख, संजय कुलकर्णी, कैलास भुतेकर, भिवसन ससाणे, डॉ. राजेंद्र जगताप, समाधान कांबळे,रवींद्र मोरे अरूण आहेर,प्रा.सुनिल बनसोडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत गरीब होतकरू हुशार गुणी अशा ६० विद्यार्थ्यांना मोफत “शालेय दप्तरांचे” वाटप करण्यात आले.या मुळे विद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळाला असून विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले, युनायटेड ग्लोबल फेडरेशनचे दुर्गेश बनकर यांनी सांगितले की आमच्या संस्थेच्या वतीने आता पर्यंत ३०००विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप केले आहे, तसेच या संस्थेच्या वतीने भविष्यात ही, हा स्तुत्य उपक्रम चालूच ठेवणार आहोत अशी भावना व्यक्त कली. ग्लोबल फेडरेशनचे या सामाजिक बांधिलकी जपण्याच्या प्रयत्नांचे मान्यवरांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 5 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे