सायं दै. तर्कसंगत चे कार्यालय व दुकान अज्ञात चोरट्यानी फोडले

जालना /प्रतिनिधी,दि.26
जालना तालुक्यातील सरस्वती माता मंदिर खरपुडी रोड, वर सायं. दै. तर्कसंगत चे कार्यालय व रंगनाथ किराणा दूध डेअरी अज्ञात चोरट्यानी दुकानाच्या मागील बाजूस पत्राला वाकून चोरी केली आहे. याविषयीं सविस्तर वृत्त असे की,जालना तालुक्यातील सरस्वती माता मंदिर खरपुडी रोड, वर सायं. दै. तर्कसंगत चे कार्यालय व रंगनाथ किराणा दूध डेअरी आहे. संपादक गोपाल त्रिवेदी हे नित्य नियमा प्रमाणे आपले कार्यालय व दुकान दि. 24 जुलै रोजी रात्री 10.30 च्या सुमारास बंद करून गेले असता रोजच्या प्रमाणे दि. 25 जुलै रोजी सकाळी 7.30 वाजता गोपाल त्रिवेदी यांचा मुलगा आदर्श त्रिवेदी याने दुकान उघडली असता दुकानातील सामान अस्तव्यस्त दिसल्याने त्याने मागे जाऊन पहिले असता मागील बाजूस पत्रा हा उचकटलेला पाहिल्याने त्याने त्याचे वडील गोपाल त्रिवेदी यांना फोन करून सांगितले असता त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता तालुका पोलीस ठाण्याचे जमादर बावरे यांनी घटना स्थळी धाव घेऊन तात्काळ पंचनाम केला. गोपाल त्रिवेदी यांच्या फिर्यादी वरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध भांदवी 304 (अ ), 331 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बावरे हे करीत आहे.