काळेगाव गणातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रा. योगेश सवडे यांना उमेदवारी देण्याची मागणी.
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.30
टेंभुर्णी जिल्हा परिषद गटात समाविष्ट असणाऱ्या काळेगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नांदखेडा काचनेरा किन्ही गट ग्रामपंचायतचे युवा सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वक्ता सेल चे जिल्हा उपाध्यक्ष प्रा योगेश पाटील सवडे यांना उमेदवारी देण्याची मागणी या गणात समाविष्ट असणाऱ्या गावातील कार्यकर्त्यांनी केली आहे.काळेगाव गण हा नव्याने अस्तित्वात आलेला असून या गनामध्ये काळेगाव, खानापूर, वरखेडा फिरंगी काचनेरा, डोलखेडा, नांदखेडा,शिराळा, किन्ही,वाढोणा, पापळ या गावांचा समावेश आहे.प्रा.योगेश सवडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून माजी आमदार चंद्रकांत दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामधन पाटील कळंबे, महिला जिल्हाध्यक्ष डॉ सुरेखा लहाने यांचे ते अतिशय विश्वासू समजले जातात.प्रा. योगेश सवडे हे उच्चशिक्षित असल्याने आणि या गणात समाविष्ट असणाऱ्या गावामध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे त्यांना या गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी,त्यांना उमेदवारी दिल्यास ते नक्कीच विजय संपादन करतील अशी आग्रही मागणी या गणात समाविष्ट असणाऱ्या गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी केली आहे.



