pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

गुरुकुल मध्ये आरोग्य स्वास्थ्य कार्यशाळा संपन्न

0 4 0 5 0 2
[sp_wpcarousel id="1375"]

बीड/निशिकांत गोरे,दि 5

आज दिनांक 5/4/2023 रोजी आरोग्य स्वास्थ्य कार्यशाळा
गुरुकुल नॅशनल स्कूल मध्ये घेण्यात आली यामध्ये प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी आशुतोष जी महाराज दिव्य ज्योती जागृती संस्थान ‌ लातूर शाखेच्या साध्वी सु.श्री अन्नपूर्णा भारतीजी तसेच सु. श्री लक्ष्मी भारतीजी व त्यांची टीम हे सर्व उपस्थित होते . सर्वप्रथम गुरुकुल मध्ये मार्गदर्शन करण्याकरिता लाभलेल्या साध्वी सु .श्री अन्नपूर्णा भारती जी यांचे स्वागत प्रिन्सिपल श्री नवगरे सर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच सु श्री लक्ष्मी भारतीजी यांचे स्वागत शिंदे मॅडम यांनी केले तसेच दिव्य ज्योती जागृती संस्थान च्या अन्य सदस्यांचे स्वागत शाळेतील सहशिक्षिका माने मॅडम ,सोडगीर मॅडम , निश्चळ मॅडम, झोडगे मॅडम, इत्यादींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तद्नंतर अन्नपूर्णा भारती जी यांनी विद्यार्थ्यांना आपण स्वास्थ्य कसं सांभाळलं पाहिजे आपण आपल्या स्वास्थ्याची रक्षा कशी केली पाहिजे याचे प्रात्यक्षिकी पुढील प्रमाणे स्वच्छ हात म्हणजे निरोगी हात . स्वच्छ अवयव म्हणजे निरोगी अवयव. स्वच्छ शरीर म्हणजेच निरोगी शरीर अनेक उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थ्यांना लाख मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच साध्वी सु.श्री लक्ष्मी भारती जी दातांच्या संदर्भात नाकाच्या संदर्भात घशाच्या संदर्भात वेगवेगळे चार्ट दाखवून स्वास्थ्य हेच मनुष्याची खरी संपत्ती आहे त्या संपत्तीची काळजी घेणे हे परम कर्तव्य आहे असे म्हणून सखोल ज्ञान पाहून त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर दिव्य ज्योती जागृती संस्थान लातूर शाखेच्या साध्वी सु श्री अन्नपूर्णा भारती जी तसेच साध्वी लक्ष्मी भारती जी यांचे सखोल ज्ञान तसेच मानव जातीच्या कल्याणासाठीचे हे प्रयत्न पाहून श्री अशोक रुपनर सर यांनी त्यांचे कौतुक केले व पुढे म्हणाले साधु ,संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्ती प्रमाणे या गुरुकुल मध्ये ज्ञानदान करणाऱ्या समस्त विद्वतजनांचे केव्हाही स्वागतच आहे म्हणून त्यांचे आभार मानले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहशिक्षक श्री घाडगे सर श्री देवकते सर श्री उत्तरेश्वर सर तसेच अन्य समस्त सहशिक्षिका व लातूर शाखेची समस्त टीम व श्रीकृष्ण गरजे यांनी प्रयत्न केले.

2/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 0 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे