राजुरवाडी येथे कुष्ठरोग आरोग्य शिबिराचे आयोजन आशा सेविकांचा उस्पूर्त प्रतिसाद,
मोर्शी /प्रतिनिधि,दि 25
मोर्शी : राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मूलन नवजीवन आरोग्य सेंटर राजुरवाडी, विविध मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबीरात रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबाराचेउद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे, यावेळी कृषी सोसायटी भांबरे सर, ठवळी सर, पुंड सर, जैन सर, थोरात सर यांच्या हस्ते अहिल्या बाई होळकर डॉ् बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले . टिबी, बीपी, शिगोर, सिकल्सेख, थाईरॉक्स इत्यादी आरोग्य तपासणी करण्यात आली व गोरगरीब जनतेची सेवाभावी समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचा गौरव केला. यावेळी रुक्षारोपण करण्यात आले व ग्रामपंचायत चे सदस्य सरपंच म्हणाले की आरोग्य ही संपत्ती असून आपण तिला जपलं पाहिजे, छोट्या छोट्या आजारांकडे दुर्लक्ष न करता आपण वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर प्रथम उपचार करावा, यावेळी आरोग्यं अधिकारी डॉ. जयसिंगकर, डॉक्टर आगरकर, गटप्रवर्तक अमृते या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे वाटप करण्यात आले. राजुरवाडी उपकेंदाच्या आश्या सेविका व नेरपिंगळाई सोसायटी चे अधक्ष्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



